How to Start a Business in India?भारतात स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा?
सारांश (Summary)
या लेखात आपण भारतात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींची माहिती घेणार आहोत.Shop Act, Udyam Aadhar, GST आणि इतर परवाने कसे काढायचे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ.
1. Business Structure निवडणे (Choosing Business Entity)
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हे ठरवावे लागेल की तुम्ही एकटे मालक असणार आहात की भागीदारीत व्यवसाय करणार आहात.
- Proprietorship (प्रोप्रायटरशिप): जर तुम्ही एकटेच मालक असाल. हे सर्वात सोपे आहे.
- Partnership Firm (भागीदारी संस्था): दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून व्यवसाय करत असतील तर.
- Private Limited Company (प्रायव्हेट लिमिटेड): जर तुम्हाला गुंतवणूक वाढवायची असेल आणि मोठा व्यवसाय करायचा असेल.
2. Shop Act License (शॉप ऍक्ट लायसन्स)
कोणताही व्यवसाय, दुकान किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी स्थानिक नगरपालिकेकडून किंवा महानगरपालिकेकडूनShop and Establishment Act अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. यालाच आपण 'गुमास्ता' परवाना असेही म्हणतो.
काळाची गरज: हे लायसन्स बॅंक खाते उघडण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
3. Udyam Aadhar (उद्यम आधार / MSME Registration)
भारत सरकारचा लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आहे. उद्यम आधार नोंदणी केल्यास तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळतो, तसेच बॅंक लोन मिळण्यास मदत होते.
- हे पूर्णपणे मोफत आहे.
- आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरची आवश्यकता असते.
4. GST Registration (जीएसटी नोंदणी)
जर तुमची उलाढाल (Turnover) 20 लाखांपेक्षा जास्त असेल (सेवा क्षेत्रासाठी) किंवा 40 लाखांपेक्षा जास्त असेल (वस्तू विक्रीसाठी), तर तुम्हाला GST नंबर घेणे अनिवार्य आहे.
पण, जर तुम्हाला राज्याबाहेर माल विकायचा असेल किंवा ई-कॉमर्स (Online) व्यवसाय करायचा असेल, तर उलाढाल कितीही असली तरी GST अनिवार्य असू शकतो.
5. Bank Account (बँक खाते)
व्यवसायासाठी Current Account (चालू खाते) उघडणे कधीही चांगले. यामुळे तुमचे वैयक्तिक व्यवहार आणि व्यवसायाचे व्यवहार वेगळे राहतात.
तुम्हाला व्यवसायासाठी कायदेशीर मदत हवी आहे का?
वकिलांकडून योग्य सल्ला घ्या आणि तुमचा व्यवसाय कायदेशीर अडचणींपासून मुक्त ठेवा.
