Right to Information (RTI) Actमाहितीचा अधिकार कायदा (2005)
By Adv. Ajay Mane•Updated: January 3, 2026•4 min read
RTI म्हणजे काय? (What is RTI?)
माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये कोणत्याही भारतीय नागरिकाला सरकारी कामाची, निर्णयांची किंवा योजनेची माहिती मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे सरकारी कारभारात पारदर्शकता येते.
1. RTI अर्जासाठी कोणती माहिती मागवता येते?
तुम्ही खालील माहिती मागवू शकता:
- सरकारी निर्णय आणि पत्रव्यवहार.
- रस्त्यांच्या कामाचा तपशील आणि खर्च.
- सरकारी योजनेतील लाभार्थी यादी.
- तुमच्या अर्जावर झालेली कार्यवाही.
2. RTI अर्ज कसा करावा? (How to file RTI?)
पद्धत 1: ऑफलाईन (Offline)
- एका साध्या कागदावर जन माहिती अधिकारी (PIO) यांच्या नावे अर्ज लिहा.
- विषय: माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळणे बाबत.
- तुमचे नाव, पत्ता आणि हवी असलेली माहिती स्पष्ट लिहा.
- ₹10 चा कोर्ट फी स्टॅम्प किंवा पोस्टल ऑर्डर जोडा.
पद्धत 2: ऑनलाई (Online - Maharashtra)
- rtionline.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा.
- 'Submit Request' वर क्लिक करा.
- फॉर्म भरा आणि ₹10 फी ऑनलाईन भरा.
3. महत्त्वाच्या गोष्टी (Important Points)
- वेळेची मर्यादा: माहिती 30 दिवसांच्या आत मिळणे बंधनकारक आहे.
- जीवित किंवा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती: 48 तासांच्या आत मिळणे आवश्यक आहे.
- माहिती न मिळाल्यास: तुम्ही 'प्रथम अपीलीय अधिकारी' (First Appellate Authority) कडे 30 दिवसांनंतर अपील करू शकता.
कायदेशीर सल्ला हवा आहे?
RTI अर्ज कसा लिहावा किंवा माहिती मिळत नसेल तर काय करावे, यासाठी वकिलांचा सल्ला घ्या.
